स्थैर्य, फलटण, दि.२५: गुणवरे ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. त्या नंतर विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. गुणवरे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नूतन पदाधिकारी कटिबद्ध राहणार आहोत अशी ग्वाही गुणवरे ग्रामपंचायतीचे नवनियुक्त उपसरपंच प्रा. रमेश आढाव यांनी दिली.
गुणवरे ता. फलटण येथील वार्ड क्रमांक २ मधील दलित वस्तीतील जुनी चावडी आणि अण्णाभाऊ साठे नगर मधील सामाजिक सभागृह या दोन्हीची दुरूस्ती व बांधकामांचा शुभारंभ सरपंच सौ. शशीकला गावडे यांचे शुभहस्ते नुकताच करण्यात आला. सदरची मंजुर कामे १४ व्या वित्त आयोगातुन करण्यात येत आहेत. अन्य कामांची सुरुवातही आगामी काही दिवसांमध्ये केली जाणार असल्याचे सौ. गावडे यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गावडे, गुणवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रा. रमेश आढाव, सदस्या सौ. सविता आढाव, ग्रामपंचायत सदस्य अंकुश गरगडे सर, राणुबाई आढाव, मिनाताई कांबळे, बापुराव कणसे, सेवानिवृत्त पोलिस हवालदार चव्हाण, ऋषीकेश आढाव, कैलास आढाव, दिपक आढाव, गोविंद आढाव, हरि नाळे, सुरेश रामहरी आढाव, अण्णा मुरलीधर आढाव, बाळासाहेब गौंड, तुकाराम गावडे, युवराज बागाव यांचेसह विविध संस्थाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.