दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून येथील ऊस उत्पादकांच्या तसेच श्रीराम कारखान्यातील कामगारांच्या पर्यायाने फलटण तालुयाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटीबध्द आहे आणि राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या वतीने राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले, श्रीराम व जवाहरचे कामगार प्रतिनिधी बाळासाहेब काशिद, मुन्नाभाई शेख, सर्जेराव सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत संजीवराजे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे दिली आणि त्याबद्दल तुम्ही माझा हा सत्कार करत आहात, त्याबद्दल मनापासून आभार. हा माझा कुटुंबातील पहिलाच सत्कार आहे. आज श्रीराम कारखाना यशाकडे वाटचाल करत आहे, त्या पाठीमागे सहकाराची व कुटुंबाची भावना आहे. त्यामुळे आता हा कारखाना कधीच अडचणीत येऊ शकत नाही. हा कारखाना जेव्हा सुरू झाला, तेव्हा या कारखान्याचे आणि फलटणच्या ऊस उत्पादकांचे अतूट नाते होते. हा कारखाना माझा आहे, माझ्या मालकीचा आहे, ही भावना जोपर्यंत होती, तोपर्यंत हा कारखाना चांगला चालला होता. त्यावेळी या तालुयाचे सर्व अर्थकारण या कारखान्यावर अवलंबून होते. आज ती परिस्थिती नाही. आज उसाचे क्षेत्र वाढले आहे. अनेक उद्योग येथे सुरू झाले आहेत. कारखान्यांची स्पर्धा वाढली आहे. ज्यावेळी सहकारी साखर कारखान्यात राजकारण घुसले, त्यावेळी हे साखर कारखाने अधोगतीला लागले आणि याचा अनुभव श्रीरामएवढा कुणालाच नाही.
श्रीराम अडचणीत आला, तेव्हा श्रीमंत रामराजेंनी हा कारखाना चालवायला घेतला तो फत सहकार वाचावा, फलटण तालुयातील शेतकर्यांचे हित जपले जावे या उद्देशातूनच. त्यावेळी श्रीराम कारखान्यातील कामगारांनीही रामराजेंना मोठे सहकार्य केले. काही अडचणी आल्या, कामगारांचे पगार टप्प्याटप्प्याने दिले जात होते. तेही कामगारांनी सोसले. त्यावेळी कारखाना बंद होऊ नये, हेच रामराजेंनी पाहिले. रामराजेंनी त्यावेळी राजकारण, अर्थकारण सर्व बाजूला ठेवून कारखान्यातील कामगारांचे व शेतकर्यांचे हित पाहिले. ज्यावेळी कारखाना अडचणीत आला, तेव्हा रामराजेंनी दोन सहकारी तत्त्वावर चालणार्या संस्था एकत्र आणल्या व या कारखान्याचे पुन्हा यशाकडे मार्गक्रमण सुरू झाले. कलाप्पाणा आवाडेंसारख्या सहकाराची पूर्ण जाण असणार्या माणसाचे सहकार्य आपल्याला श्रीरामला अडचणीतून काढण्यासाठी मिळाले. श्रीरामचा कलाप्पाणा आवाडेंच्या जवाहर सहकार साखर कारखान्याशी १५ वर्षे आपण करार केला. त्यानंतर पुन्हा १५ वर्षांचा करार केला; परंतु हा करार करताना कलाप्पाणा म्हटले होते की, तुम्ही कारखाना चालविण्यासाठी सबळ झाले आहात, तुम्ही आता श्रीराम चालवा; परंतु आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला हा कारखाना १० हजार गाळप क्षमतेपर्यंत नेण्याचा आहे, तेवढे पैसे आम्ही उभे करू शकत नाही, हा कारखाना आम्हाला वाढवायचा आहे. तुमच्या कारखान्याच्या पार्टनरशीपवर हा पैसा उभा होणार आहे, म्हणून पुन्हा १५ वर्षांचा करार केला. या करारास तुम्ही कामगारांनी मान्यता दिली, हे महत्त्वाचे आहे. हा कारखाना वाढवायचा आहे, या कारखान्यास पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, पर्यायाने येथील कामगारांचे व शेतकर्यांचे हित जपले जावे, याच भावनेतून आपण सर्वांनी जवाहरबरोबरच्या करारास मान्यता दिली. श्रीराम हा फलटण तालुयातील सहकारी तत्त्वावर चालणारा एकमेवर कारखाना राहिला आहे, असे श्रीमंत संजीवराजे म्हणाले.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे पगार आज तालुयातील इतर खाजगी कारखान्यांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहेत. या पाठीमागे फत सहकार आहे. येथे फत कामगार व ऊस उत्पादकांचाच फायदा पाहिला जातो. श्रीराम कारखाना सहकारावर चालणारा शेतकरी व कामगारांचा कारखाना आहे. कारखान्यातील कामगारांचे आत्तापर्यंतचे सहकार्य उल्लेखनीय आहे. हा कारखाना सहकारातील क्षेत्रातला उद्योग म्हणूनच चालवावा लागणार आहे. मगच पाहिजे तसे यश या कारखान्याला मिळणार आहे. आता आपल्याला राजकारण न बघता फत तालुयाचा विकास हा द़ृष्टीकोन पुढे ठेवून चालायचे आहे.
या सत्कारास कारखान्याचे संचालक महादेवराव माने, अशोकराव सोनावणे, कार्यकारी संचालक तळेकर, पाटील, चिफ इंजिनिअर हिरगुडे, चिफ केमिस्ट माने, असि. इजिनिअर शिंदे, नाळे, शिंदे, देसाई, सरडे, साळुंखे, पाटील, हातले, श्रीराम व जवाहरचे कामगार प्रतिनिधी हणमंतराव खोमणे, प्रदीप शिंदे, संतोषराव खटके, महेशराव ढेकळे, बाळासाहेब कोकरे, मदनराव पवार, अविनाश नाळे, पप्पू आदलिंगे, मयूर शिंदे, रणजित शिंदे, मच्छिंद्र भोसले, दिगंबर ननवरे आदी सर्व कामगार बंधू उपस्थित होते.