स्थैर्य, औंध, दि. २६ : त्रिमली ता.खटाव येथील वर्धन अँग्रो कारखान्याच्या सन2020-21 च्या तोडणी वाहतूक करारास बुधवार दिनांक 24 जून पासून कारखान्याच्या कार्यस्थळावरती कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांच्या उपस्थितीत सुरवात झाली.
यावेळी संचालक संजय माने, संतोष घाडगे, वसंत यादव,राजेंद्र घाडगे, दत्तात्रय घाडगे, शिवाजी रेणुसे,रखमाजी दोरगे, संजय गायकवाड,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डूबल ,तोडणी वाहतूक कंत्राटदार, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले, वर्धन अँग्रो ची निर्मिती शेतकऱ्यांची तीव्र इच्छा शक्ती व धैर्यशील दादांन वरील सभासदांचा दृढ विश्वास यातून झाली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कारखानदारी समोर अनंत अडचणीच्या काळात सुद्धा लोकांना न्याय देण्याची भूमिका व्यवस्थापन जपत आलेले आहे. ऊस तोडणी मजुर व कंत्राटदार हा कारखानदारी चा महत्वाचा घटक असून या गळीत हंगामात करार करणाऱ्या कंत्राटदारांच्या पाठिशी व्यवस्थापन नेहमी राहील. कारखान्याने ऊस वाहतूक कंत्राटदार यांना चांगला दर दिलेने तोडणी वाहतूक कंत्राटदार मोठ्या उत्साहाने करार करण्यास येत आहेत. याही वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असून 5 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन तांत्रिक सर्व ती आवश्यक ऑफ सिझन ची कामे पूर्ण होत आली आहेत.
गळीत हंगामात कारखाना सप्टेंबरमध्ये चालू करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन काम करत आहे. ऊस उत्पादक शेतकरी व सभासद शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.