राष्ट्रीय छात्रसेनेच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । सातारा ।  22 महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन सातारा आयोजित आठ दिवसीय प्रशिक्षण शिबिरास 3 ऑगस्ट २०२२ रोजी प्रारंभ झाला आहे. या शिबिरात सातारा जिल्ह्यातून आलेल्या शालेय व महाविद्यालयीन 550 मुला-मुलींना कठोर सैनिकी शिस्तीत मिलिटरीचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येत आहे. छात्र सैनिकांनी कठोर परिश्रम घेऊन सैनिकी शिस्तीचे पालन करीत लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून समाज व देशसेवेसाठी तत्पर रहावे असे आवाहन शिबिराच्या प्रारंभ सत्रात छात्र सैनिकांना मार्गदर्शन करताना कँप कमांडर कर्नल दीपक ठोंगे म्हणाले की’’ जीवनात उच्च धेय ठेवून परिस्थितीशी संघर्ष करीत प्रामाणिक प्रयत्न केले तर जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते.’’

महागाव येथील डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये छात्र सैनिकांना कठोर शारीरिक प्रशिक्षणासोबत कवायत,ट्रेकिंग, मेप रीडिंग व शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देऊन फायरिंग करण्याची संधी दिली जाते. छात्र सैनिकांच्या शारीरिक विकासाबरोबरच बौध्दिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ‘मानसिक आरोग्य’ याविषयावर प्रा.गणेश पाटील यांचे व्याख्यान झाले तर कँपच्या तिसऱ्या दिवशी शौर्य पुरस्कार विजेता
जिवरक्षक दिनकर कांबळे यांनी ‘’आपत्कालीन परिस्थितीत प्रथम उपचार’’ या विषयी प्रात्यक्षिक सादर केले. समाजशील व राष्ट्रनिष्ठ नेतृत्व निर्माण करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संवाद कौशल्य कला आत्मसात कशी करावी याविषयी डॉ. मनीषा पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.कॅम्प कमांडर कर्नल दीपक ठोंगे साहेब व कर्नल एम.व्ही भालशिंग यांच्या नेतृत्वाखाली सुबेदार मेजर सतीश तपासे आणि 22 आर्मी स्टाफ तसेच एन.सी.सी.ऑफिसर लेफ्टनंट बाळकृष्ण भोसले, लेफ्टनंट केशव पवार, फर्स्ट ऑफिसर, सीमा जोशी, थर्ड ऑफिसर दिनेश काळे, बालाजी जाधव, मोहन बागुल, केअर टेकर नीलिमा पाटील, सोनाली घोरपडे हे यशस्वी आयोजन करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!