स्थैर्य,नवी दिल्ली, दि.२१: भारत आणि चीनमध्ये 10 व्या फेरीतील मिलिट्री लेव्हलची चर्चा शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजेच 16 तास चालली. ही बैठक चीनच्या मॉल्डो परिसरात झाली. यामध्ये पूर्व लडाखच्या हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देप्सांगवरुन सैन्य मागे हटवण्यावर चर्चा झाली. मिळालेल्या वृत्तानुसार, चर्चेमध्ये भारताने आपले मत मांडत म्हटले की, या तीन क्षेत्रांमध्येही माघारीची प्रक्रिया जलद व्हावी, सीमेवर तणाव कमी करण्यात यावा.
11 फेब्रुवारीला संसदेत राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये माघारीची माहिती दिली होती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 11 फेब्रुवारीच्या सकाळी राज्यसभा आणि संध्याकाळी लोकसभेत लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य मागे हटल्याची माहिती दिली होती. या करारामुळे भारताने काहीच गमावले नाही असा दावाही त्यांनी केला होता आणि ते म्हणाले की आम्ही कोणत्याही देशाला त्याची एक इंच जमीनही घेण्यास परवानगी देणार नाही.
डिसएंगेजमेंट कराराबद्दल 7 मोठ्या गोष्टी
भारत आणि चीनने लष्करी डिसएंगेजमेंट करण्यास सहमती दर्शवली आहे. मिलिट्री डिसएंगेजमेंट म्हणजेच आतापर्यंत आमने-सामने राहिलेल्या दोन देशांच्या सैन्यांचे कोणत्याही क्षणी मागे हटणे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानुसार, डिसएंगेजमेंटसाठी 7 निर्णय झाले.
- दोन्ही देश फॉरवर्ड डिप्लॉयमेंट हटवतील. म्हणजेच दोन्ही देशांच्या ज्या तुकड्या आतापर्यंत एकमेकांच्या खूप जवळ तैनात होत्या, त्या मागे हटतील.
- चीन आपल्या तुकड्यांना पँगॉन्ग लेकच्या नॉर्थ बँकमध्ये फिंगर-8 च्या पूर्वेकडे ठेवेल.
- भारत आपल्या तुकड्यांना फिंगर-3 जवळ परमानेंट थनसिंह थापा पोस्टवरर ठेवेल.
- पँगॉन्ग लेकपासून डिसएंगेजमेंटच्या 48 तासांच्या आत सीनियर कमांडर लेव्हलची चर्चा होईल आणि उर्वरित मुद्द्यावर तोडगा काढला जाईल. (डिसएंगेजमेंट 10 फेब्रुवारीपासून सुरू झाले.)
- सरोवराच्या नॉर्थ बँकप्रमाणे साउथ बँकमध्येही डिसएंगेजमेंट होईल. (कधीपासून होईल हे अद्याप सांगितलेले नाही.)
- एप्रिल 2020 पासून दोन्ही देशांनी पँगॉन्ग लेकच्या नॉर्थ आणि साउथ बँकवर जे कंस्ट्रक्शन केले आहेत, ते हटवण्यात येतील आणि पहिली अवस्था कायम ठेवण्यात येईल.
- दोन्ही देश नॉर्थ बँकवर पेट्रोलिंग सध्या थांबवतील. वाटाघाटी करून एखादा करार झाल्यावरच पेट्रोलिंगसारख्या सैन्य कारवाया सुरू होतील.