दैनिक स्थैर्य | दि. ३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
जालना येथील लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरंगे पाटील व इतर सहकारी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबार-लाठीचार्ज केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मराठा समाजाला ओबीसीतून ५० टक्केच्या आतून आरक्षण मिळवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील चौक, फलटण येथे सोमवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनास सर्व मराठा समाजातील बांधवांनी हजारोंच्या संख्येने आपल्या वाहनांसह उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने करण्यात आले असून यावेळी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून राज्य सरकारला बांगड्यांचा आहेर देण्यात येणार आहे.