आयएसएफसीचा लीडसह सहयोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । मुंबई । शिक्षणक्षेत्रामध्ये परीवर्तन घडवून आणण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत इंडियन स्कूल फायनान्स कंपनी (आयएसएफसी) या अग्रगण्य बिगर-बँकिंग वित्तीय कंपनीने लीड या देशात सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या स्कूल एडटेक उद्योगसंस्थेबरोबर एक सामंजस्य करार केला आहे.

या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत लीड आणि आयएसएफसी या कंपन्या परवडण्याजोगे शिक्षण पुरविणा-या शाळांना संसाधने पुरवून त्यांचे सक्षमीकरण करतील, विद्यार्थी अध्ययनाच्या परिणामांत आणि शिक्षकांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणतील, एक सर्वसमावेशक शिक्षण परिसंस्थेची उभारणी करतील आणि आपल्या कार्यकक्षेचा देशभरात विस्तार करतील.

या सहयोगामुळे आयएसएफसीला लीड जवळ असलेल्या २५०० शाळांच्या नेटवर्कचा वापर अधिक शाळा आणि शैक्षणिक संस्थापर्यंत पोहोचण्यासाठी करता येईल. आयएसएफसीशी संलग्न शाळांना लीडच्या एकात्मिक शिक्षण यंत्रणेचा लाभ मिळेल व त्यातून शाळांचे तंत्रज्ञानाधारित सेंटर्स ऑफ एक्सलन्समध्ये परिवर्तन घडवून आणता येईल. यामुळे मुलांसाठी शिक्षण हे मनाला अधिक भावणारे आणि शिकण्याचा उत्साह वाढविणारे बनू शकेल.

आयएसएफसीचे एमडी आणि सीईओ श्री. संदीप विरखरे म्हणाले, “आपल्या स्थापनेपासूनच आयएसएफसीने भारताच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती आपली बांधिलकी जपली आहे आणि आमच्या या प्रवासामध्ये आम्ही बरीच मजल गाठली आहे. खास परवडण्याजोगे शिक्षण पुरविणा-या मात्र कर्ज मिळविण्याच्या बाबतीत आव्हानांचा सामान करत असलेल्या शाळांना पतपुरवठा करणारी आमची पहिलीच कंपनी आहे. आता या सहयोगातून लीड नेवटर्कमधील २५०० हून अधिक शाळांसह आमच्या ५००० हून अधिक भागीदार शाळा आणि संस्थांसोबत एक ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वांगिण नाते जोडण्याचे आमचे लक्ष्य आहे.”


Back to top button
Don`t copy text!