दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । मुंबई । क्यूरेटेड लिव्हिंग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या दिव्याश्री ग्रुप कंपनीने विशाखापटणममध्ये विद्यार्थी निवास सुविधा लॉन्च करण्यासाठी आंध्रप्रदेश मेडटेक झोन (एएमटीझेड) सोबत सहयोग केला आहे. को-लिव्हिंग ऑपरेटरने एएमटीझेडच्या परिसरामध्ये असलेल्या वैद्यकीय संस्थांच्या विद्यार्थ्यांना संपन्न निवास व्यवस्थेचा अनुभव देण्यासाठी शहरामध्ये ५००-बेड सुविधेचा पाया रचला आहे.
हिंदुस्तान सिरिंग्ज अॅण्ड मेडिकल डिवाईसेस लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिवाईस इंडस्ट्री (एआयएमईडी) येथील फोरम कोऑर्डिनेटर श्री. राजीव नाथ हे भूमीपूजन समारोहाला उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी इतर मान्यवर देखील उपस्थित होते, जसे जागतिक आरोग्य संघटनेचे नाविन्यता, डिजिटल हेल्थ व स्थिर विकासामधील प्रमुख श्री. लुईस एजर्सनॅप आणि आंध्रप्रदेश मेडटेक झोन (एएमटीझेड)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र शर्मा.
एएमटीझेड हा भारत सरकार आणि आंध्रप्रदेश सरकारने वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी स्थापन केलेला उद्योग आहे. उत्पादन खर्च ४० टक्क्यांपर्यंत पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून एएमटीझेडचा उत्पादने परवडणारी आणि उपलब्ध होण्याजोग्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात भारताला जागतिक अग्रणी बनवण्याचा दृष्टीकोन आहे.
एएमटीझेडने विजाग कॅम्पस येथील सहा-महिन्यांच्या कार्यकाळासह वैद्यकीय तंत्रज्ञानावर १२ महिन्यांचा उपक्रम सादर करण्यासाठी ई-लर्निंग कंपनी स्किल-लिंकसोबत सहयोग केला आहे. विद्यार्थी निवास सुविधा विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय सुविधा आणि ऑफरसह निवासाची आवश्यकता पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. कंपनी अॅसेट-हेवी मॉडेलअंतर्गत विद्यार्थी निवास सुविधा कार्यान्वित करणार आहे.
क्यूरेटेड लिव्हिंग सोल्यूशन्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जयकिशन छल्ला म्हणाले, “आम्हाला विद्यार्थी निवास सुविधा लॉन्च करण्यासाठी एएमटीझेडसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. क्यूरेटेड लिव्हिंग सोल्यूशन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच उच्च दर्जाच्या सेवा देण्याप्रती कटिबद्ध राहिलो आहोत. या सहयोगासह आमचा एएमटीझेडच्या परिसरातील सर्वोत्तम निवासाचा शोध घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारची सेवा देण्याचा मनसुबा आहे. आम्ही दीर्घकाळापर्यंत भाडेतत्त्वावर एएमटीझेडच्या विद्यार्थ्यांना उद्देशपूर्ण निर्मित निवास केंद्राची निर्मिती करण्यासाठी एएमटीझेडसोबत सहयेाग केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑन-कॅम्पस राहणीमानाचा अनुभव मिळण्यासोबत एएमटीझेडच्या दर्जात्मक वैज्ञानिक सुविधांमध्ये प्रत्यक्ष अध्ययनासह त्यांचे ज्ञान वाढवण्यास मदत होईल.”