दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभागाच्या वतीने गुरुवार, दिनांक ९ सप्टेंबर,२०२२ रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात होते. नाणी प्रदर्शनाचे उद्घाटन करून चर्चासत्राची सुरुवात करण्यात अली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. सीमा कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि डॉ. दत्तात्रय कोरडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर उपप्राचार्या डॉ. रोशनआरा शेख आणि इतिहास विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) धनाजी मासाळ यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ व बुके देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात अॅडव्होकेट सीमंतिनी नूलकर यांनी ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा जिल्ह्यातील महिलांचे योगदान’ या विषयावर विस्तृत व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, झरकारीबाई याचबरोबर सावित्रीबाई फुले ते आजपर्यंतच्या महत्त्वाच्या स्त्रियांच्या कार्याचा आढावा आपल्या मार्गदर्शनात घेतला. तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या सत्रातील साधनव्यक्ती आराधना गुरव यांनी ब्रिटीशांचे भारतात आगमन ते सत्तास्थापना आणि नंतर त्यांच्या अन्यायी व शोषणयुक्त कारभारामुळे झालेला १८५७ चा उठाव व त्यातून निर्माण झालेली क्रांतीची बीजे यांचा आढावा घेतला. त्यानंतर सातारा क्रांती दिनाचे महत्त्व सांगताना १८५७ मध्ये सातारा येतील १७ नरवीर कशाप्रकारे शहीद झाले व त्या १७ नरवीरांची माहिती करून दिली. यानंतर पत्रकार विजय मांडके यांनी सातारा राजद्रोहाचा खटला या विषयावर संदर्भासहित वास्तव व परखड अशी माहिती दिली. सातारा राजद्रोह खटला कसा चालला, आरोपींना कशा प्रकारे शिक्षा देण्यात आल्या व त्याची अंमलबजावणी कशी केली याची सूक्ष्म माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर यातील शहीद क्रांतिकारकांची विस्तृत माहितीही त्यांनी यावेळी दिली. यानंतर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या रोशनआरा शेख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर असलेल्या प्रा. शीला जाधव व शरद गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी शीला जाधव यांनी आपली काही पुस्तके
इतिहास विभागाच्या ग्रंथालयास भेट दिली. याच कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील लेजर प्लेस येथे नाणी प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये मध्ययुगीन कालखंडापासून ब्रिटीश कालखंडापर्यंतच्या नाण्यांचा समावेश होता. नाणी ठेवण्यात आली होती. साताऱ्यातील विविध माध्यमिक शाळामधील ९७६ विद्यार्थ्यांनी व त्यांच्याबरोबर १३ शिक्षकांनी या प्रदर्शनास भेट दिली. त्याचबरोबर विविध २३४ महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. माधवी गोडसे यांनी उपस्थितांचे आभार
व्यक्त केले. सदर चर्चासत्र यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी कला वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. आर. बी. सातपुते, महिला महाविद्यालयाचे प्रो. (डॉ.) बोडके एस.एस., पुसेगाव महाविद्यालयाचे प्रा. किरण कुंभार आपल्या विद्यार्थ्यांसह यावेळी उपस्थित होते. इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. डी. बी. मासाळ, रुसा
योजनेचे समन्वयक डॉ. सुभाष कारंडे, इतिहास विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक डॉ. आर.व्ही.कुंभार, प्रा. एम. एस. निकम, डॉ. व्ही. एस. येलमार, डॉ. डी. डी. कोरडे, प्रा. के. एस. वाघमारे, प्रा. एस. टी. ठोकळे, व प्रा. सौ. एम. एम. गोडसे तसेच इतिहास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.