दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२३ । मुंबई । सीएलएक्सएनएस या डिजिटल-फर्स्ट डेब्ट रिझॉल्युशन प्लॅटफॉर्मने ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. हे कंपनीचे धोरणात्मक पाऊल आहे, जे कंपनीच्या झपाट्याने प्रगती करण्याच्या आणि देशभरात प्रबळ उपस्थिती असण्याच्या ध्येयाशी संलग्न आहे.
सीएलएक्सएनएस प्रॉडक्ट, इंजीनिअरिंग व डिझाइन ते मार्केटिंग आणि डेटा अॅनालिटिक्सपर्यंत विविध वर्टिकल्समध्ये नियुक्ती करण्याचा मनसुबा आहे. कंपनी तंत्रज्ञानात प्राविण्य असलेल्या मध्यम-स्तरीय प्रतिभेसह प्रमुख नेतृत्वाच्या भूमिकेसाठी अनुभवी व्यावसायिकांना ऑनबोर्ड करण्यास उत्सुक आहे. नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचा-यांच्या सहाय्याने आणि कंपनीच्या तंत्रज्ञान क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून सीएलएक्सएनएसचे भावी उद्दिष्ट उच्च-स्तरीय अनुपालन आणि प्रशासनासह स्केलेबल, डिजिटल-फर्स्ट डेब्ट रिझॉल्युशन टूल्स तयार करण्याचा आहे.
सीएलएक्सएनएसचे मानवजीत सिंग म्हणाले, ‘‘सध्याची बाजारपेठ स्थिती अस्थिर आहे, पण आमचा दृढ विश्वास आहे की टॅलेंटला नियुक्ती करण्याची कोणतीच योग्य किंवा चुकीची वेळी नाही. आमचा विश्वास आहे की, भारताची पत वाढीची गाथा नुकतीच सुरू झाली आहे आणि त्याला प्रचंड चालना मिळण्याची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच आम्ही नैतिक कर्ज निराकरणाच्या संधींमध्ये प्रचंड वाढीची अपेक्षा करतो. सीएलएक्सएनएसमध्ये आमचा स्केलेबल, डिजिटल-फर्स्ट डेब्ट रिझॉल्युशन कंपनी बनण्याचा एकमेव मानस आहे. त्याचबरोबर, आम्ही तंत्रज्ञान क्षमतांमध्ये कौशल्य असलेल्या उद्योगातील एक टॅलेंट पॉवरहाऊस म्हणून उदयास येऊ इच्छितो. आम्हाला विश्वास आहे की, नवीन टॅलेंटची भर करत आम्ही संपूर्ण भारतामध्ये आमच्या पाऊलखुणा विस्तारण्याच्या आमच्या उद्दिष्टांच्या एक पाऊल जवळ पोहोचू आणि आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ.’’