दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । फलटण । शहरामध्ये विविध ठिकाणी नगरपरिषदेसह इतर आवश्यक असणार्या कायदेशीर परवानगी नसताना परमिट रूम व बियर बार राजरोजपणे सुरू आहेत. तरी सदरील परमिट रूम व बियर बार तातडीने बंद करावीत, अशी मागणी कामगार संघर्ष संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे.
याबाबत कामगार संघर्ष संघटनेच्यावतीने फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे. त्यावर संस्थापक अध्यक्ष सनी काकडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव गायकवाड, सातारा जिल्हा अध्यक्ष अमर झेंडे, उपाध्यक्ष सुरज भैलुमे यांच्या स्वाक्षर्या आहेत.