वीज वितरण च्या कंत्राटी कर्मचाऱ्याला पाचवड येथे जीवे मारण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । वीज वितरण कंपनीसाठी जिल्ह्यामध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणारे 2800 कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांपैकी शिरगाव तासगाव जिल्हा सांगली येथे राहणारा शंकर कळसे पाचवड तालुका खटाव येथे खांबावर चढला असता अचानक वीज पुरवठा चालू करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला या प्रकारामध्ये कळसे याला विजेचा जोरदार धक्का बसून तो गंभीरित्या जखमी झाला आहे साताऱ्यात वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या नावाखाली 17 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे या प्रकरणाला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झालाय की काय असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि या प्रकरणातील मूळ तक्रारदार दिलीप शिंदे उपस्थित होते.

सचिन मोहिते पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला सातारा शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कंत्राटी तत्वावर काम करणारे 2800 कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांचे पगार 12 हजार रुपये असून दर महिन्याला या यांच्या पगारातून 1100 रुपये कपात केली जाते ही कपात बेकायदेशीर असून या कपातीला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमकी येत आहे ही कपात राणा ॲग्रोटेक नावाच्या कंपनीच्या खात्यावर जात आहे या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी तपास करून सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला या कंपनीचा सूत्रसंचालक सोमनाथ गोडसे याला अटक करण्यात आली आहे या प्रक्रियेत त्याला आता जामीन झाला असला तरी या प्रकरणांमध्ये पुढाकार घेणाऱ्या दिलीप शिंदे शंकर कळसे इत्यादी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत या प्रकरणाची आम्ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी आम्हाला सांगली येथे तक्रार करण्याची सुचवले आहे.

या प्रकरणात मोठे राजकीय वजन असणारी धेंडे समाविष्ट असून राणा ऍग्रोटेक सारख्या कंपन्या म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहेत या प्रकरणांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी मोहिते यांनी केली . कळसे या कंत्राटी कर्मचाऱ्याला पाचवड येथे तो तांत्रिक कामासाठी वीज खांबावर चढला असता अचानक वीज प्रवाह चालू करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हाय एक्सटेंशन लाईनचा त्याला जोरदार धक्का बसून कळसे हे लांब जोरदार फेकले गेले त्यामध्ये त्यांच्या डोक्याला बारा टाके पडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत सातारा पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करणे गरजेचे आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन तपास अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास मंदावला आहे वडूज येथील या प्रकरणाशी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे त्यामुळे हा 18 कोटीचा घोटाळा आणि त्या मागचे गौडबंगालाचा सोक्षमोक्ष पोलिसांनी काय ते सत्य समोर आणावे असे आवाहन सचिन मोहिते यांनी केले आहे जर या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर संबंधित कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करून कर्मचारी संघटनेला न्याय देण्याकरता वाटेल तो त्या करण्यासाठी आपण तयार आहोत असा इशारा मोहिते यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!