सनी काकडे व अमीर शेख यांच्या माध्यमातून शहरात स्वच्छता अभियान


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । फलटण । सामाजिक कार्यकर्ते सनी काकडे व अमीर शेख यांच्या माध्यमातून फलटण शहरात झालेल्या डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आलेली आहे.

या स्वच्छता अभियानाच्या पहिल्या टप्यात राजे उमाजी नाईक चौक, गजानन चौक ते श्रीराम मंदिर या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

सदरील स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी, काँग्रेसचे पदाधिकारी, कामगार संघर्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण शहरात झालेल्या डेंग्यूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी विविध पथके तयार करून त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार असल्याचे या वेळी कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक सनी काकडे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!