दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२४ | फलटण |
गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर फलटण बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सर्व अधिकारी, चालक-वाहक कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली.
याप्रसंगी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, स्थानकप्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक काका नाळे व कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होत्या.
स्वच्छता मोहीमप्रसंगी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी सर्व कर्मचारी बंधू-भगिनी व प्रवासी बंधू-भगिनी यांना गुढीपाडवा व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व प्रवाशांनी आपले बसस्थानक स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.