पुरग्रस्त भागाची आरोग्य विषयक स्वच्छता तातडीने करा : श्रीमंत संजीवराजे


 

स्थैर्य, फलटण दि.१७: बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाधीत झालेल्या सर्व कुटुंबांना पुरेशी मदत, तात्पुरता निवारा, तसेच ज्यांच्या राहत्या घराचे नुकसान झाले त्यांना आवश्यक मदत करण्याबरोबर शनिनगर, गणेशनगर (मलठण) व पठाणवाडा परिसरात पुरेशा नागरी सुविधा, तीनही पुलांची (वेलणकर दत्त मंदिर पूल, पांदारवेस पूल, श्री हरिबुवा मंदिर पूल) तातडीने दुरुस्ती आणि आरोग्य विषयक स्वच्छता तातडीने करण्याच्या सूचना सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नगर परिषद प्रशासनाला दिल्या आहेत.

बाणगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या शनिनगर, गणेशनगर (मलठण) व पठाणवाडा भागाला आज (शुक्रवार) सकाळी मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी भेट देऊन बाधीत कुटुंबांची भेट घेऊन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी माजी नगराध्यक्ष मा.श्री.पांडुरंग गुंजवटे, आरोग्य समिती सभापती मा.सौ.दिपालीताई शैलेश निंबाळकर, नगरसेवक मा.श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैया), नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, मा.श्री.राहुल निंबाळकर (भैया) उपस्थित होते.

नगर परिषद बांधकाम विभागातील नगर रचनाकार अजिंक्य पाटील, सहाय्यक नगर रचनाकार शंतनु बावसकर, कार्यालयीन निरीक्षक मुस्ताक महात, कनिष्ठ अभियंता कु.विभावरी देसाई, बांधकाम लिपिक गणेश काकडे यांच्या कडून नुकसानीची माहिती घेतल्यानंतर याबाबत सविस्तर अहवाल तयार केल्यानंतर तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना देताना नदीवरील तीनही पुलांची, रस्त्याची दुरुस्ती व आरोग्य विषयक सुधारणा कामे तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!