श्रीमंत उदयसिंहराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त आज शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ डिसेंबर २०२४ | फलटण |
श्रीमंत उदयसिंहराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता पद्मभूषण पं. राजन-साजन मिश्रा यांच्या शिष्या विदुशी नबनिता चौधरी (दिल्ली) यांचा शास्त्रीय, नाट्यगीत व अभंग गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ड्रॉईंग हॉल, मुधोजी हायस्कूल, फलटण येथे होणार आहे.

या गायनास तबला साथ ताराशिष बक्षी व हार्मोनियम निलय साळवी यांची असणार आहे.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

Back to top button
Don`t copy text!