
सातारा- शास्त्रीय संगीत गायन करताना स्वरसाधना संगीत विद्यालयाचे जेष्ठ कलाकार. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 15 फेब्रुवारी, सातारा : येथे श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात महाशिवरात्रीच्या सकाळच्या सत्रात सातारा येथील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या ज्येष्ठ कलाकारांनी शास्त्रीय गायनाची सुरेख अशी रागांची बरसात करून ही सकाळ रम्य केली.
या गायन कार्यक्रमात सौ.यांनी मुलतानी रागातील बडा ख्याल ,छोटा ख्याल सादर करत ,,आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,, शंकर श्री गिरी,, आणि ..नटराजने नाट्यवडू.. हे कानडी भजन सादर केले त्यानंतर सौ.गोडबोले यांनी गुजरी तोडी रागात बडा ख्याल आणि छोटा ख्याल अतिशय सुरेखपणे आळवला.ज्येष्ठ गायिका सौ.संगीता कोल्हापुरे यांनी बहादुरी तोडी राग सादर करत यामध्ये बडा ख्याल, छोटा ख्याल आणि सिंदूर रागातील ..चतुरंग.. सादर केला .सौ .उज्वला नानल यांनी ज्योनपुरी राग सादर करत त्यामध्ये बडा ख्याल ,छोटा ख्याल म्हणून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. सौ .प्रज्ञा लाटकर यांनी मदमाद सारंग राग सादर करून बडा ख्याल आणि छोटा ख्याल म्हणला. या सर्व कलाकारांना वाद्यांच्या साथ संगतीत संवादिनीवर बाळासाहेब चव्हाण तर तबल्यावर विश्वनाथ पुरोहित आणि मकरंद ताटके यांनी साथ संगत केली .
या सर्व ज्येष्ठ कलाकारांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन नटराज मंदिराच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी, वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,नारायण राव यांचे सह सातारा परिसरातील अनेक संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

