क्लियरने एक्स्पेडाइजचे अधिग्रहण केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । मुंबई । क्लियर (क्लियरटॅक्स), या भारताच्या सर्वांत मोठ्या फिनटेक सास कंपनीने आज आपण पुरवठा साखळी वित्तीय तंत्रज्ञान कंपनी एक्स्पेडाइजचा ताबा घेतल्याची घोषणा केली. यबॅन्क या दुसऱ्या बी२बी पेमेंट प्लॅटफॉर्मचा ताबा घेतल्यानंतर हा क्लियरचा दुसरा ताबा आहे. या ताब्यासोबत क्लियर एसएमई क्रेडिट आणि बी२बी पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या आपल्या योजनेत एक पाऊल पुढे जाईल.

एक्स्पेडाइज प्लॅटफॉर्म ज्याला आता क्लियर इन्व्हॉइस डिस्काऊंटिंग असे नवीन नाव दिले जाणार आहे, त्यातून पुरवठादारांना तात्काळ चालू भांडवल आणि रोखता दिली जाईल. आर्थिक वर्ष २२ च्या शेवटापर्यंत वार्षिकीकरण केलेल्या १००० कोटी जीएमव्हीवर प्रक्रिया केली जाईल अशी अपेक्षा आहे. हा स्मार्ट एआय/ एमएलवर आधारित प्लॅटफॉर्म ईआरपीला जोडतो आणि त्यांच्या पुरवठादारांना पुरवठादार व त्यांचे एसएमई ग्राहक यांना आपसात स्वीकारार्ह असलेला सवलतीचा दर निवडण्यासाठी मदत करतो. उद्योजक आपल्या ट्रेझरी कॅशवर फक्त अतिरिक्त उत्पन्नच मिळवणार नाहीत तर सुयोग्य ईआरपी समावेशासह डिजिटल पद्धतीने पुरवठादारांचे पेमेंट व्यवस्थापित करू शकतील.

क्लियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी आधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, ““भारतीय व्यवसायांना वेगवान पेमेंट आणि कार्यक्षम वित्तपुरवठ्याची साध्यता मिळवणे गरजेचे आहे. ग्राहक पेमेंट्स हे यूपीआयमुळे रिअलटाइम झालेले आहेत. परंतु मोठ्या कंपन्यांच्या पुरवठादारांसाठीही बरेच काही करता येऊ शकते असे आम्हाला वाटते. हा ताबा भारतीय उद्योगांच्या दोन जीवनरेखांना सक्षम करण्याचा प्रवास वेगवान करतो. एक्स्पेडाइज प्लॅटफॉर्म विविध मोठ्या उद्योगांसोबत आधीच काम करत आहे आणि त्यांना त्यांच्या पुरवठादारांना वेगाने प्रदान करण्यासाठी मदत करत आहे. आमचा विश्वास आहे की, क्लियरमधील एका स्वतंत्र व्हर्टिकलमध्ये आमच्या सर्व तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा समावेश असेल आणि आम्हाला लाखो पुरवठादारांना सेवा देण्यासाठी वेग प्राप्त करण्यास मदत करेल.”

“हा ताबा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आम्ही मोठ्या उद्योगांसाठी पुरवठा साखळी वित्तपुरवठा प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारतातील मोठ्या प्रमाणावरील व्यवसाय केंद्रे आमच्या जीएसटी सुयोग्य सूटचा वापर करतात आणि हे ग्राहक नेटवर्क इफेक्टचा फायदा घेऊ शकतील. उच्च पुरवठादार सहभाग, उद्योगांसाठी शून्य ओव्हरहेड्स आणि अधिक चांगला सवलत दर या गोष्टी या क्षेत्रात व्याप्ती वाढवण्यासाठी लक्ष्याधारित बाबी आहेत,” असे गुप्ता म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!