गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या आवाजाबाबत शहर पोलिसांचे सर्वेक्षण; नागरिकांकडून मागवले अभिप्राय

ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे १६ ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार मत; वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवणार


स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने एक अभिनव सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी एक ऑनलाईन गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून, नागरिकांनी त्यावर आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

‘डीजे’च्या मोठ्या आवाजामुळे होणारे आरोग्य आणि मालमत्तेचे नुकसान, उत्सवासाठी ‘डीजे’ची आवश्यकता आहे का, आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कारवाई करावी, अशा विविध प्रश्नांवर या सर्वेक्षणात मते मागवण्यात आली आहेत. हा सर्वेक्षण अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १६ ऑगस्ट २०२५ आहे.

या गुगल फॉर्ममध्ये नागरिकांचे नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर अशी कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता आपले मत नोंदवावे.

फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रहिवाशांनी https://forms.gle/EYM3n7Q1EEMbvTpQ8 या लिंकवर जाऊन या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!