गहाळ 75 मोबाईलचे शहर पोलिसांकडून तक्रारदारांना वितरण


दैनिक स्थैर्य । 31 मे 2025। फलटण । येथील शहर पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईल फोनच्या अनेक तक्रारी येथे प्राप्त झाल्या होत्या. या गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा नुकताच फलटण शहर पोलिसांनी शोध घेत चोरट्यांकडून मोबाईल फोन हस्तगत केले. चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये एकूण 75 मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले.

या सापडलेल्या 75 मोबाईल फोनचे वितरण तक्रारदारांना शुक्रवार (दि. 30) रोजी करण्यात आले. तक्रारदारांना मोबाईल फोन सोबत झाडाचे रोप भेट देऊन पर्यावरणपूरक संदेश फलटण शहर पोलिसांनी दिला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय अधिकारी राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.

पोलीस शिपाई स्वप्नील खराडे यांनी झाडाचे रोप भेट दिले.

गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यामध्ये सातारा सायबर पोलीसांची मदत झाली.


Back to top button
Don`t copy text!