दैनिक स्थैर्य । दि. ०२ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहरात दुचाकी चोऱ्या करणाऱ्या दोन गुन्हेगारांना सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने अटक करण्यात आली आहे. किशोर हनुमंत माने वय 20 रा. तडवळे ता. कोरेगाव, शिवराज संतोष फाळके वय 19 रा. पॉवर हाऊस रोड सातारारोड, ता. कोरेगाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अजंठा चौक परिसरामध्ये दोन युवक विदाऊट नंबर प्लेटची बजाज पल्सर मोटरसायकल फिरवताना संशयास्पदरित्या दिसून आले. डीबी पथकाने सदर मोटरसायकलला पाठीमागून पकडले असता त्यांनी ती मोटरसायकल जबरदस्तीने पळवण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी त्यांना जागेवरच पकडले आणि सदर मोटरसायकल संदर्भात विचारपूस केली असता त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही म्हणून संबधितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदर मोटरसायकल चोरीची असल्याचे त्यांच्या एकाच ठिकाणी सांगितले. बारामती तालुक्यातून ती दुचाकी चोरी करण्यात आली होती. या संदर्भातील गुन्हा वडगाव निंबाळकर कार्यक्षेत्रातला असून बारामती पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन्ही चोरट्यांकडून दोन दुचाकी करण्यात जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे हवालदार सुजित भोसले अविनाश चव्हाण ज्योतीराम पवार पंकज ढाण्या अभय साबळे गणेश घाडगे संतोष कचरे यांनी भाग घेतला होता.