४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
स्थैर्य, फलटण, दि. ०१ : फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये सापडत आहेत त्या मुले संपूर्ण फलटण शहर हे कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ह्या काळामध्ये दवाखाने व मेडिकल सोडून इतर सर्व अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद राहणार आहेत, असे आदेश फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी पारित केलेले आहेत.
फलटण शहरामध्ये सुमारे एक हजार ऍक्टिव्ह रुग्ण असल्याने संपूर्ण फलटण शहर हे सात दिवसासाठी बंद राहणार आहे. संपूर्ण फलटण शहर हे कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून या मध्ये भाजी मंडई, किराणा दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समितीसह श्रीराम सहकारी साखर कारखाना सुद्धा बंद राहणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.