स्थैर्य, फलटण : तालुक्याच्या ग्रामीण भागातून फलटण शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने पंचायत समितीच्या आवारामध्ये जी एटीएम सुविधा सुरू केलेली आहे, ते एकदम स्तुत्य असून आगामी काळामध्ये या एटीएमचा उपयोग फलटण तालुक्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल, असे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण पंचायत समितीच्या आवारात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर, उपसभापती सौ. रेखा खरात, पंचायत समिती सदस्य नानासाहेब लंगुटे, सचिन रणवरे, सौ. रेश्मा भोसले, संजय कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण शहरामध्ये ग्रामीण भागातून येणार्या नागरिकांना एटीएम मार्फत चांगली सुविधा मिळावी. यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने एटीएम सेंटर सुविधा फलटण पंचायत समितीच्या आवारातील एका गाळ्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. याचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.