
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 25 मे 2025 | फलटण | गेल्या ३ – ४ दिवसांपासून फलटण शहरासह तालुक्यात सततचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बाणगंगा नदी प्रवाहित झाली असली तरी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात शहरातील शनिनगर परिसरात नदी पात्राच्या बाजूला उभारण्यात आलेल्या भिंतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकानव्ये दिली आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकात प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे की, “बाणगंगा नदीला पाणी आले की शहरातील नदी शेजारचा परिसर असलेल्या शनीनगर भागातील घरांमध्ये पाणी शिरत होते. याची तात्काळ दखल घेत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व तत्कालीन आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये खर्चातून संरक्षक भिंत बांधण्यात असून अंतिम काम प्रगती पथावर आहे. या ठिकाणच्या पुलाचेही काम अंतिम टप्यात आहे.
या सर्व कामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून याबद्दल नागरिक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना धन्यवाद देत असल्याचेही, प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे.
