रोहित पवारांना चौथी शिकणाऱ्या चिमुरडीचे भावनिक पत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, बारामती, दि. 20 : प्रशासन आणि जनतेला विश्वासात घेऊन एखाद्या ठराविकच मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदाराचे प्रभावी काम असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत राज्यभर अशा नेतृत्वाच्या आपलेपणाची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. मग ते काम कोणत्याही क्षेत्रातील असो, आमदार रोहित पवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर केलेले काम कौतुकास्पद आहेच आणि त्यातच त्यांनी आपला मतदारसंघ असलेल्या जामखेड या एकाच तालुक्यातील कोरोना बाधितांची तब्बल सतरावर गेलेली रूण्गसंख्या कोणताही वेगळा पॅटर्न न राबवता योग्य नियोजनातून प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने आटोक्यात आणून आपला मतदारसंघ कोरोनामुक्त केला.

त्यातच आता आमदार रोहित पवारांनी केलेल्या कामावर प्रभावित होऊन बीडच्या आष्टी तालुक्यातील आष्टा गावातील इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या मृण्मयी विकास म्हस्के या चिमुरडीने लिहिलेले भावनिक पत्र सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तिने या पत्रात, दादा जामखेडमधुन जसा कोरोना तुम्ही घालवला तसा प्लीज आष्टीमधुनही घालवाना. कारण आष्टीमध्ये माझी आजी, मामा-मामी, निलू, इंदू, दिदी, अजूभैय्या, निखुभैय्या राहतात. माझ्या पप्पांना मी विचारले होते की प्रत्येकजण कुणाला तरी भीत असतो तर कोरोनासुद्धा कुणाला तरी भितच असेल ना? तर माझे पप्पा म्हणाले होते, हो भीतो ना! रोहितदादाला. आणि डॉक्टर-पोलिसांना. म्हणुन म्हणते जामखेडमधुन कोरोना गेला आता दादा प्लीज तुम्ही आष्टीला लवकर जाऊन त्या कोरोनाला भीती घालाना! मला माझी आजी ते सगळे खुप आवडतात. तुम्ही आष्टीत गेल्यावर कोरोना लांब पळून जाईल कधी जाता मग आष्टीला? प्लीज लवकर जा.

आ. रोहित पवारांनी सर्वांना प्रभावित करणाऱ्या उत्तम कार्यपद्धतीने फार कमीवेळात प्रत्येकाच्या मनात आपले घर निर्माण केल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहावयास मिळत आहेत. दरम्यान मृण्मयी म्हस्के या चिमुरडीचे पत्र वाचून रोहित पवारांनी तिच्याशी संवाद साधला आहे. कोरोनाला अजिबात घाबरायचे नाही असा विश्वास देत तेथील प्रशासन, राजकीय मंडळी माझ्यासारखीच काळजी घेत आहेत. सर्वजण खुप चांगले काम करत असल्यामुळे कसलीही काळजी करायची नाही. काहीही होणार नाही. काही मदत करता आली तर मी नक्कीच करेन, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!