मुलांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटसाठी मोफत सवलत; ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत मुदत वाढ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

लहान मुलांच्या आधार कार्डाबाबत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) महत्त्वाची घोषणा केली आहे. ५ आणि १५ वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य असून, ही सेवा ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. पालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वेळेत अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १५ नोव्हेंबर : देशात ओळखपत्र म्हणून आधार कार्डचे महत्त्व सर्वपरिचित आहे. जन्मापासून ५ वर्षांखालील मुलांसाठी निळ्या रंगाचे ‘बाल आधार कार्ड’ काढले जाते. या बाल आधार कार्डवर फक्त मूळ फोटो आणि आधार क्रमांक असतो, ज्यामध्ये लहान वयामुळे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन समाविष्ट केले जात नाहीत. मात्र, मूल ५ वर्षांचे आणि त्यानंतर १५ वर्षांचे झाल्यानंतर त्याचे बायोमेट्रिक विवरण अद्ययावत करणे बंधनकारक असते.

बायोमेट्रिक अपडेटची प्रक्रिया आणि मोफत सवलत

वाढत्या वयानुसार मुलांचे शारीरिक बदल लक्षात घेता, अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) करणे गरजेचे असते. युनिक आयडेंटिफायन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) स्पष्ट केले आहे की, ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट करण्याची सुविधा ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादरम्यान पालकांना कोणत्याही शुल्काशिवाय जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करता येणार आहे.

अपडेटसाठी काय करावे?

पालक आधार केंद्रावर थेट जाऊन किंवा UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करून हे काम करू शकतात. अपडेट करताना मुलाचा नवीन फोटो, दहाही बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन घेतले जाते. यासाठी पालकांनी मुलाचे जुने आधार कार्ड, जन्म दाखला आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे, तसेच प्रक्रियेनंतर मिळणारी पावती व यूआरएन (URN) क्रमांक जपून ठेवावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!