जातीचा दाखला पळविल्याची महिला उमेदवाराची तक्रार चिखली गावातील प्रकार, पोलीस दाद देत नसल्याचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१४: गावातील काही समाजकंटकांनी जातीचा दाखला पळवून नेल्याने माझा ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज बाद झाला आहे . या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी चिखली ता सातारा येथील वंदना खेतरू झुंजार यांनी पत्रकार परिषदेत केली .
खेतरू पुढे म्हणाल्या, गावातील भिवराम अर्जुन शिर्के, जगन्नाथ धोंडिबा शिर्के, या दोघांनी माझा इतर मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला उमेदवारी अर्ज बाद होण्यासाठी जाणीवपूर्वक लपवून ठेवला . गावाची निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी संबधितांनी हे कृत्य केल्याचा आरोप वंदना खेतरू यांनी केला .३१ डिसेंबर रोजी सदर दाखला आम्ही आणून देऊ असे आश्वासन त्यांनी सातारा तालुका पोलिसांनी दिले होते मात्र त्यांनी तो दाखला शेवटपर्यंत दिला नसल्याचे खेतरू झुंजार यांनी सांगत या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली .वंदना झुंजार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे .

Back to top button
Don`t copy text!