
स्थैर्य, फलटण, दि. १६ सप्टेंबर: फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांची पुणे महानगरपालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. ते आज, मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी पुणे येथे आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आपल्या दीड वर्षांच्या फलटणमधील कार्यकाळाला उजाळा देताना, त्यांनी सर्व नागरिकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याबाबत माहिती देताना निखिल मोरे म्हणाले, “मागील दीड वर्षापासून फलटण नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून काम करताना आपणा सर्वांची खूप चांगली मदत आणि मार्गदर्शन मिळत राहिले. बदली हा प्रशासकीय अधिकाऱ्याच्या जीवनातील एक अविभाज्य भाग असतो. माझ्या वैयक्तिक कौटुंबिक कारणास्तव पुणे येथे बदलीसाठी शासनाकडे विनंती केली होती आणि त्यानुसार माझी बदली झाली आहे.”
“आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.