मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । मुंबई । महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

“महात्मा बसवेश्वर यांनी वर्ण, जात, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा भेदाभेदांना कडाडून विरोध केला. त्यांनी प्रागतिक समाज रचनेचे विचार मांडले. स्त्रियांच्या समानतेचा पुरस्कार केला. अनुभवमंटपद्वारे लोकशाही विचार प्रणाली विकसित केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!