मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महान धावपटू मिल्खा सिंह यांना श्रद्धांजली


स्थैर्य, मुंबई, दि. १९: महान धावपटू पद्मश्री मिल्खा सिंह यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचे प्रेरणास्थान हरपले आहे. त्यांनी आपल्या कामगिरीने भारतीय आणि जागतिक पातळीवरही आदर-सन्मान मिळवला आहे. भारतातील तरुणांच्या हृदयात त्यांनी देशभक्त खेळाडू म्हणून आगळा आदर्श निर्माण केला. दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्दीचे प्रतीक म्हणून मिल्खा सिंह चिरंतन स्मरणात राहतील. आपल्या क्रीडा नैपुण्यातूनही राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाची प्रचिती देता येते. यासाठी मिल्खा सिंह यांची कारकीर्द, देशभक्ती येणाऱ्या पिढ्यांसाठी, विशेषतः क्रीडा ‌क्षेत्रासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. महान धावपटू पद्मश्री मिल्खा सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


Back to top button
Don`t copy text!