दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महान योद्धे, वीर महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मेवाड नरेश महाराणा प्रताप हे शूर, साहसी आणि पराक्रमी राजे होते. त्यांनी मुघल साम्राज्याला रोखण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली होती. एक कुशल संघटक, वीर योद्धा व महान राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केले.