मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उप जिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते.

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी त्यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिनम्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. त्या दृष्टीने ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार व विकास होणे आवश्यक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी वाचन प्रेरणा दिनाच्याशुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. कलाम यांना विनम्र अभिवादन केले. 


Back to top button
Don`t copy text!