मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुरसुंगी-ऊरळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची केली पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । पुणे । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवेली तालुक्यातील तुकाई टेकडी येथे फुरसुंगी-ऊरळी देवाची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची भेट देऊन पाहणी केली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, पुणे मनपाचे पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली.


Back to top button
Don`t copy text!