
स्थैर्य, 28 फेब्रुवारी, सातारा : महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय शासनामार्फत घेण्यात आले आहेत. उदा. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्ययावतीकरण इत्यादी. सदर सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान तीव्र स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. महसूल विभागामधील सुधारणांचा लाभ सर्व सामान्य जनतेला करुन देणेसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.। दिनांक 18 फेब्रुवारी, 2026 से 15 में, 2026 या कालावधीत राबविणेत येणार आहे. याअभियानामध्ये शिबीर आयोजित करुन प्रामुख्याने खालीलप्रमाणे सेवा उपलब्ध करून देणेत येणार आहे.
प्रलंबित फेरफार निकाली काढणे.अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत तात्काळ सेवा उपलब्ध करुन देणेत येणार आहे. (सर्व प्रकारचे दाखले वाटप करणे व इतर सेवा), अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ होईल यादृष्टीने कार्यवाही 5. भूसंपादन केलेल्या व अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाय दप्तरअद्यावत करणेत येणार आहे.,
Ease of Doing Business सुधारणा या नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेत येणार आहे., ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी एम किसान, बाबत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन करुन कार्यवाही करणेत येणार आहे.
आंबवडे मंळळ – जोतीराम लाड मंगल कार्यालय करंजे तर्फ परळी 07 मार्च 2026, वडूथ मंडळ – साई आशिर्वाद मंगल कार्यालय आरफळ 07 मार्च 2026, तासगांव मंडळ – इंद्रनिल मंगल कार्यालय जैतापूर 07 मार्च 2026, अपशिंगे मंडळ – अर्सेंम्ब्ली हॉल अपशिंगे – 14 मार्च 2026, परळी मंडळ – श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी, 14 मार्च 2026, वर्ये मंडळ – जिजाबा आण्णा सांस्कृतीक भवन गोवे, 14 मार्च 2026, कण्हेर मंडळ – गणेश मंदीर हॉल साबळेवाडी, 10 एप्रिल 2026, शेंद्रे मंडळ – कुमठे विठठल रुक्मिनी मंगल कार्यालय, 10 एप्रिल 2026, कोडोली मंडळ – सांस्कृतीक भवन कोडोली 10 एप्रिल 26, खेड मंडळ -बाळसिध्दनाथ मंदीर म्हसवे, एप्रिल 2026. दहिवड मंडळ – केदारेश्वर मंदीर रोहोट 17 एप्रिल 2026, नागठाणे मंडळ- वरद मंगल कार्यालय नागठाणे 17 एप्रिल 2026, करंजे ता. सातारा मंडळ – पोलिस करमणूक केंद्र तालीम संघाजवळ 8 मे 2026. सातारा मंडळ – पोलिस करमणूक केंद्र तालीम संघाजवळ सातारा- 15 मे 2026.
तरी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 मध्ये आयोजित करण्यात येणार्या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून पात्र लाभार्थी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामीण व नागरी भागातील विद्यार्थी यांनी सदर शिबिरारमध्ये त्यांना आवश्यक असणाऱे दाखले उपलब्ध करुन घेण्याचे आवाहन आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी सातारा यांनी केले आहे.
