छत्रपती शिवाजी कॉलेजचे ‘शिवविजय २०१९-२०’ नियतकालिक, महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत शिवाजी विद्यापीठात द्वितीय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । सातारा । शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सेमिनार विभागाने नुकततेच २४ ऑगस्ट २०२२ रोजी शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेचे २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचे निकाल जाहीर केले. यातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील नियतकालिक स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजच्या’शिवविजय‘या नियतकालिकाने विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला. या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी ‘शिवविजय २०१९-२० ‘नियतकालिकाचे संपादन केले होते. या यशाबद्दल संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व संपादन समितीतील डॉ.कांचन नलवडे,डॉ.सादिक तांबोळी, डॉ.रोशनआरा शेख, डॉ.पोर्णिमा मोटे, प्रा.विजया गणमुखी, डॉ.सुरेश झोडगे, डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा.ए.के जगताप, प्रा.उषादेवी घाडगे , प्रा.साधना पाटील, प्रा.दीपक कवठेकर ,वैभव शेडगे ,दिलीप हंकारे ,दशरथ रणदिवे, प्रिंट ओम ऑफसेटचे संदेश शहा,जतीन शहा ,प्रशांत गुजर,कृष्णा चिंचकर व सहभागी लेखक विद्यार्थी यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी अभिनंदन केले. कोरोनाच्या काळात या स्पर्धेतील सन २०१८-१९ व २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचे निकाल प्रलंबित होते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षात विद्यापीठाकडे बिगर व्यावसायिक कॉलेज गटात ३५ महाविद्यालये सहभागी झाली होती. शिवविजय नियतकालिकाने अनेकदा विद्यापीठाचा पहिला,दुसरा क्रमांक मिळविला आहे. शिवविजय अंकाचे पूर्वीचे संपादक डॉ.शिवाजी पाटील, व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी महाविद्यालयाची ही परंपरा अशीच पुढे चालवावी अशा शुभेच्छा देत संपादक मंडळाचे अभिनंदन केले. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश दुकळे व संघटना सदस्यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!