छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच : संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जानेवारी २०२३ । फलटण । होय, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादंग झाले आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांनी संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली आहे.

शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेतून ग्रंथ लिहिला होता. अनेक विविध विषयावरती छत्रपती संभाजी महाराजांनी लेखन केलेला आहे. ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या. छत्रपती संभाजी महाराज उत्तम इंग्रजीचे जाणकार व भाष्यकार होते. छत्रपती जाती धर्माच्या अस्मितेवरून व महापुरुषांच्या प्रतिष्ठेवरून भाजपकडून नेहमीच राजकारणाची परिसीमा ओलांडली. या भाजपच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही संभाजी ब्रिगेडकडून निषेध करतो. भाजपला छत्रपती संभाजी राजेंबद्दल खरेच प्रेम असेल तर ज्या गोळवलकर गुरुजीने बंच ऑफ थॉटमध्ये शंभुराजेंची बदनामी केली ते पुस्तक तुम्ही जाळणार का ? ही संभाजी ब्रिगेडची भूमिका असल्याचे संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे यांनी सांगितले.

संभाजी महाराज यांचा लढा हा कोणत्याही धर्मासाठी जातीसाठी नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी त्याचबरोबर स्वराज्यातील सर्वच मावळ्यांचा लढा स्वराज्याच्या विस्तारासाठी होता. म्हणूनच तंजावर पासून पेशावरपर्यंत स्वराज्य उभा राहिले होते. शिवरायांच्या शंभूराजांच्या सैन्य दलामध्ये विविध जातीच्या विविध धर्माचे विविध पदाधिकारी व अधिकारी होते. याचे अनेक पुरावे आणि अनेक दाखले इतिहासकारांनी आजपर्यंत अनेक वेळा समोर ठेवलेले आहेत. काल परवा अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करताना स्वराज्यवीर असा केला, औरंगजेब, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इंग्रज यापासून स्वराज्य वाचवणारे, स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आणि स्वराज्यवीरच आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!