दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम रंगकर्मींसाठी राज्यस्तरीय कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धा शुक्रवार दिनांक 27 ते रविवार दिनांक 29 मे रोजी पालिकेच्या छत्रपती शाहू कला मंदिर येथे होणार आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तीस संघांना निमंत्रित करण्यात आले आहे यंदा एकांकिका स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.
या एकांकिका स्पर्धेसाठी यावर्षी सातारा सांगली कोल्हापूर महाड चंद्रपूर मुंबई कल्याण पुणे औरंगाबाद इत्यादी शहरातून दर्जेदार एकांकिका पाहण्याच्या संधी सातारकर नाट्यरसिकांना उपलब्ध झाली आहे पालिकेच्या वतीने प्रशासक आणि पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांनीही पत्रकारांना माहिती दिली.
या संदर्भात पालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याच्या नाट्यचळवळीला अधिक गती देण्याच्या हेतूने या एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत . या एकांकिका स्पर्धेत सांघिक तसेच अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत रंगभूषा, वेशभूषा, आणि बालकलावंत अशा विविध विभागातून एकूण 36 पारितोषिके देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला करंडक आणि 25 हजार रुपये रोख द्वितीय क्रमांकाला 20000 तृतीय क्रमांकाला 15000 आणि चतुर्थ क्रमांकाला दहा हजार अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
सातारकरांना या एकांकिकेच्या निमित्ताने मोफत या स्पर्धा पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे या नाट्य सादरीकरणाचा सातारकरांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अभिजित बापट व स्पर्धा समन्वयक माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी केले आहे.