कास मार्गावरील हाॅटेलवर छापा


दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑगस्ट २०२२ । सातारा । जगभरात ऐतिहासिक ठेवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कास येथे एका रिसॉर्टवर छापा टाकून पोलिसांनी एकाला ताब्यात घेत रिसॉर्ट मालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांना देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात यश आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा पोलीसांना कास येथील एका रिसॉर्टवर अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. काॅलगर्ल्स पुरविणारा इसमास सातारा तालुका पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभाग सातारा यांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. दरम्यान जगप्रसिद्ध असणाऱ्या कास या पर्यटन स्थळी अशा प्रकारच्या घटना घडू लागल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


Back to top button
Don`t copy text!