लग्नाच्या आमिषाने अत्याचार करून फसवणूक; अल्पवयीन मुलीसह तिच्या आईची आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
पवारवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील एका अल्पवयीन मुलीची लग्नाच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीसह तिच्या आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेने पवारवाडी हादरली असून या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व फसवणूक प्रकरणी तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पवारवाडी, ता. फलटण येथे दि. २१ सप्टेंबर २०२३ च्या रात्री १०.३० ते दि. २२ सप्टेंबर २०२३ च्या सकाळी ९.०० वाजण्याच्या दरम्यान आरोपी सुखदेव मिंड, त्याची पत्नी राधा सुखदेव मिंड यांनी फिर्यादी यांची भाची ुुुुही अल्पवयीन आहे, हे माहीत असताना सुध्दा त्यांनी त्यांचा मुलगा गणेश सुखदेव मिंड यास तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध निर्माण करण्यास लावले. त्यातून गणेश सुखदेव मिंड याने दि. २१ सप्टेंबर २०२३ हीस फूस लावून फलटणला नेऊन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करून त्यानंतर फिर्यादी यांच्या भाचीसोबत लग्न करण्यास नकार दिला. ही बाब पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईस सांगितल्यानंतर त्या दोघींनी काल दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता पवारवाडी गावच्या हद्दीत असलेल्या बहिणीच्या शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड व गणेश सुखदेव मिंड (सर्व राहणार पवारवाडी, ता. फलटण) यांच्यावर फसवणूक, अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रानगट करत आहेत.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)


Back to top button
Don`t copy text!