छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये व्यक्तिरेखा स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी लेजर प्लेस येथे स्वराज्य महोत्सव व्यक्तीरेखा सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर व्यक्तिरेखा सादरीकरण स्पर्धेस सुरुवात झाली.या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातून आलेल्या एकूण 36 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वारणानगर, आटपाडी, कोरेगाव, देऊर, वाठार स्टेशन, सातारा येथील विविध विद्यालयातून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धक मुलींची संख्या 31 तर पाच मुले स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये स्त्री व्यक्ती रेखांमध्ये सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा 9 स्पर्धकांनी सादर केली. तर आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी सहगल, विजयलक्ष्मी पंडित, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, दुर्गावती देवी, सिंधुताई सपकाळ, अरुणा असफअली, लक्ष्मीबाई पाटील, जिजामाता अशा महिला व्यक्तिरेखा सादर करण्यात आल्या. तसेच पुरुष व्यक्तिरेखांमध्ये लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले, भगतसिंग, वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, कामाराम भीमा या व्यक्तिरेखा सादर करण्यात आल्या. या स्पर्धेसाठी 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक, समाज सुधारक व राजकीय नेते : जीवन व कार्य ' असा विषय देण्यात आला होता. व्यक्तिरेखेस अनुरूप वेशभूषा करून स्पर्धकांनी जास्तीत जास्त पाच मिनिटात सादरीकरण करावयाचे होते. या नियमाचे पालन करून व्यक्तीरेखा सादर करायची होती.या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रक्कम रुपये 7000, रक्कम रुपये 5000 व रक्कम रुपये 3000, उत्तेजनार्थ रक्कम रुपये 2000 व प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. प्रथम तीनही क्रमांक छत्रपती शिवाजी कॉलेजने मिळवले. यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी साक्षी संजीवन घाडगे, द्वितीय क्रमांक ऋतुजा शांतीलाल पाटील, तृतीय क्रमांक समीक्षा चंद्रकांत चव्हाण यांनी मिळवला तर के. बी. पी. आय. एम. एस.आर ची कुमारी मेढेकर शरण्या हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. ओंकार यादव व डॉ. अशोक शेलार यांनी काम पाहिले यानंतर समारोप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख शंकरराव जगताप कॉलेज वाघोली चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जाधव होते. अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, छत्रपती शिवाजी कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ. रोशनआरा शेख, इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. धनाजी मासाळ, रुसा योजनेचे समन्व्यय डॉ.सुभाष कारंडे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. चंद्रकांत जाधव यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.त्यावेळी बोलताना स्वत्वाची जाणीव असेल तर मनुष्य कोणतेही कार्य उत्तम प्रकारे करू शकतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.धनाजी मासाळ यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्राध्यापक महादेव चिंदे यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व इतिहास विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!