दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । मुंबई । कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतीबा, वाडीरत्नागिरी ता. पन्हाळा येथील यात्रा करात 1 जुलैपासून प्रति भाविक 5 रुपये व कमाल 20 रुपये असा बदल करण्यात आला आहे. हा बदल मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कर व फी नियम 1959, 28 नोव्हेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आला असल्याचे ग्रामपंचायत वाडीरत्नागिरीच्या सरपंच राधा बुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.