श्री. सिध्दनाथ देवाच्या यात्रा कालावधीत म्हसवड येथील वाहतुक मार्गात बदल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । म्हसवड । म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत श्री सिध्दनाथ देवाची वार्षिक यात्रा दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस दि. 5 डिसेंबर 2021 रोजी आहे. त्यामुळे म्हसवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होवू नये याकरिता   म्हसवड ता. माण येथील श्री. सिध्दनाथ यात्रा दरम्यान  यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजेच दि. 5 डिसेंबर 2021 रोजीचे सकाळी 6.00 वा. पासुन ते 22.00 वा. पर्यंत वाहतुक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

दोनचाकी करीता व लहान वाहनाकरीता पर्यायी मार्ग म्हणून, शिंगणापुर चौक ते युवराज सुर्यवंशी यांचे निवासस्थान समोरुन शिक्षक कॉलनी-भाटकी रोड-भाटकी गांव ते माळशिरस रस्ता-माळशिरस चौक असा मार्ग तयार करण्याता आला आहे.

मोठ्या व अवजड वाहनाकरीता पर्यायी मार्ग म्हणुन पोळ पंपाचे पाठीमागुन ते खांडेकर तालीम-शिक्षण कॉलनी-भाटकी रोड-भाटकी गांव ते माळशिरस रस्ता-माळशिरस चौक असा मार्ग तयार करण्याता आला आहे.

विरकरवाडी ते म्हसवड –रथगृह बायपास ते सरकारी दवाखाना हा रोड वाहतुकीसाठी बदं करुन पुणेवरुन आटपाडी जाणेकरिता म्हसवड-हिंगणी-राजेवाडी-आटपाडी असा पर्यायी मार्ग येण्या-जाण्यासाठी तसेच विरकरवाडी-मेगासिटी-नागोबा मंदीर-कुकूडवाड मुख्य रस्ता असा तयार करण्यात आला आहे.

यात्रेकरिता  संपूर्ण महाराष्ट्रातुन तसेच कर्नाटकातुन, आंधप्रदेश राज्यातुन सुमारे 4 ते 5 लाख भाविक, व्यपारी, दुकानदार येत असतात. यात्रा कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचाप्रश्न निर्माण होवू नये व यात्रा शांततेत पार पडणे महत्वाचे आहे. याकरिता वातुकीचे नियोजन योग्यरितीने करणे आवश्यक आहे. तसेच यावर्षी सिध्दनाथ देवाच्या मिरवणुकीच्या मार्गावर माणगंगा नदीमध्ये पाणी असल्याने वरील मार्ग बदलण्यात आला आहे.

तरी वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अनव्ये कारवाई पात्र राहतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.


Back to top button
Don`t copy text!