दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२३ । सातारा । येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ,सातारा या विद्यापीठाचे कुलाधिकारी मा.चंद्रकांत दळवी हे गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कुलाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी विद्यापीठात उपस्थित राहणार आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यापीठाने स्वागत समारंभ आयोजित केला आहे. या समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील हे असून या समारंभासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा.डी.टी.शिर्के हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे,माध्यमिक विभागाचे सहसचिव राजेंद्र साळुंखे,संस्थेचे अन्य प्रशासकीय अधिकारी,विद्यापीठाच्या विविध विभागाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख,प्राध्यापक व इतर सर्व कर्मचारी
उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.विजय कुंभार यांनी दिली आहे.