चैतन्य बडवे यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण शहराध्यक्षपदी नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण शहर अध्यक्षपदी चैतन्य बडवे यांची निवड संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास भाऊ सुसर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रोहित ओंबासे यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे, फलटण तालुकाध्यक्ष तुळशीदास बडवे यांनी चैतन्य बडवे यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या फलटण शहराध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन अधिकृत रित्या निवड करण्यात आली.

त्यावेळी तुळशीदास बडवे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यास सुरुवात करण्यास सांगितले ही संघटना पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये ५℅ टक्के आरक्षण मिळवून दिले आहे. ५० सेकंड रनिंग मध्ये मिळवून दिले आहे यासारखे अनेक सामाजिक राजकीय मुद्दे घेऊन संघटना पोलीस व पोलीस व पोलीस कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत आहे. यावेळी चैतन्य बडवे यांनी पोलीस कुटुंबाच्या व सामान्य जनतेच्या लय हक्कासाठी समर्पित भावाने काम करेल असे आश्वस्त केले.

चैतन्य बडवे यांची निवड करण्यात आली; त्यावेळेस उपस्थित असलेले कायदेशीर सल्लागार मेघराज नालंदे, सल्लागार ओंकार इंगुले, पत्रकार माधव झगडे, शहराध्यक्ष शितल शहा, वैभव ननवरे, विनीत किर्वे, श्वेता डोंगरे, नंदिनी गुंदेचा, अपूर्व अढाव, दिव्या आढाव, कल्याण मोहिते, रोशन डोंगरे, विकी तेलगोटे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!