दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण |
अपना बझार, लक्ष्मीनगर, फलटण रस्त्यावर काल सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुरेखा शरदकुमार दोशी (वय ६२, रा. रामरक्षा आपार्टमेंट, लक्ष्मीनगर, फलटण, मारवाड पेठ, फलटण) येथील चंद्रपूर मंदिरात दर्शनासाठी जात असताना दोन अनोळखी इसम मोटरसायकलवरून पाठीमागून फिर्यादीचे पुढे गेले व परत वळून माघारी आले व त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चेन व मंगळसूत्रामधील अंदाजे ९ ग्रॅम वजनाचा काही भाग (अंदाजे किंमत २२ हजार ५००) ओढून घेऊन पसार झाले.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पो.ना. गळवे अधिक तपास करत आहेत.