दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२३ | फलटण |
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्यासाठी मुदत दिली आहे. त्यासाठी जरांगे पाटलांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांची साखळी उपोषणे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण तालुयातील दर्याचीवाडी या गावातील ग्रामस्थांनीही मराठा आरक्षणासाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. या उपोषणात ग्रामस्थांसह लहान मुलांनीही सहभाग घेतला आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दर्याचीवाडी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.
या आंदोलनात दर्याचीवाडीचे ग्रामस्थ नितीन जाधव, हनुमंत जाधव, शिवाजी पवार, प्रकाश सावंत, आप्पासो ढेंबरे, चैतन्य शिंदे, सिध्दांत कुमकले, शुभम कुमकले, दिपक ढेंबरे आदी सहभागी झाले आहेत.