स्थैर्य, फलटण, दि.६:
कबीरांचे दोहे, तुकोबांचे अभंग
जोतिबा फुले यांचा त्याग…
शाहुंचा सन्मान आणि विचारांचे ठेवून भान
बुध्द विचार धारा आत्मसात करीत
बाबा तुम्ही निघालात…
कोटेरी कुंपनातून दाही दिशांना प्रकाशमय करीत
अज्ञानाला विज्ञानाची दिशा दाखवीत
शिवरायांचा अवमान
संभाजीचा खून आणि अमानुष अत्याचार
तुमचा मनात छळत होता वारंवार
भिमाकोरेगावच्या क्रांतीवीरांना
निळा सलाम करुन…
उतरंडीच्या शिडीची एक-एक पायरी जाळीत
जाती अंताची लढाई लढताना
शिल-समाधी-आणि प्रज्ञेचा
पुन्हा पुन्हा उदघोष करीत
अशोक चक्राला गती देत एल्गार पुकारला
अंधाराला भेदून…
अंधास ज्ञानदृष्टी दिलीत
मुक्यांना बोलत केलत
गुलामांला माणूस घडविलेत
समतेच्या वाटेवरून चालण्यासाठी
बाबा अंतिम समयी तुम्ही निद्रीस्थ झालात
हे पाहून तो प्रखर सुर्य देखील निखळला
आकाश कोमात गेले, धरणी हादरली
ग्रहताऱ्यांनी मानवंदना देवून
चांदण्याचा वर्षाव केला
हुंदके देवून सागरही ठसा ठसा रडला
आणि चैत्यभूमीचा नवा जन्म झाला
बाबा तुमच्या पुण्याईने
स्मशानाचा सातबारा
आता माझ्या नावे झाला
– राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे
भ्रमणध्वनी – +९१ ९६६४९७८४१९