स्थैर्य, मुंबई, दि.६: मुंबईतील मेट्रो-3 प्रकल्पाकरिता कांजूरमार्ग येथे कारशेड
उभारण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला
(एमएमआरडीए) 102 एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी काढलेला आदेश बेकायदा आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीस व तेथे बांधकाम करण्यास प्राधिकरणाला स्थगिती
द्यावी, अशी मागणी केंद्राने उच्च न्यायालयात केली.
केंद्र
सरकारने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा 1 ऑक्टोबरचा आदेश तसेच राज्य
उत्पादक मंत्र्यांच्या नोव्हेंबर 2018 मधील आदेशांना उच्च न्यायालयात
आव्हान दिले. महाविकास आघाडी सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्प
कांजूरला नेला. जिल्हाधिकाऱ्यांद्वारे राज्य सरकारने कांजूर येथील 102 एकर
जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.
त्याला केंद्राने उच्च न्यायालयात आव्हान दिले.
कांजूरमार्ग
येथील भूखंड खासगी लोकांना भाडेतत्त्वावर दिला होता. त्यानंतर 2004 मध्ये
हा करार रद्द करण्यात आला. याचा अर्थ ही जागा केंद्र सरकारच्या मालकीची
आहे. मात्र, ही जागा राज्य सरकारची आहे, असे गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांनी
कांजूरची जागा एमएमआरडीएला हस्तांतरित केली का, असा सवाल उच्च न्यायालयाने
करताच सिंग यांनी होकारार्थी उत्तर दिले. पुढील सुनावणीत केंद्र सरकार आपली
बाजू मांडेल.