स्थैर्य, औंध, दि २२: केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे, केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
खटाव तालुक्यातील येळीव येथील हरणाई सहकारी सूतगिरणीवर शिक्षक संस्थाचालक, शिक्षक मेळावा कार्यक्रमात
ते बोलत होते,यावेळी आ.जयंत आसगावकर,हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे,अजितराव चिखलीकर,जि. प.सदस्य सुरेंद्र गुदगे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव,अशोक गोडसे,राजेंद्र शेलार,डॉ विवेक देशमुख,डॉ महेश गुरव, संजीव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,विनाअनुदानित शाळा,संस्थेच्या इमारतींची वीजबिले, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी इत्यादींवर लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ.शैक्षणिक वेबिनार आयोजित करण्यासाठी केंद्राची परवानगी काढावी लागणार आहे ही बाब धक्कादायक आहे,शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे मात्र त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे, एकीकडे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे,मात्र आकडेवारी बोगस देऊन दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला.
आ.जयंत आसगावकर म्हणाले की,महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही शिक्षक आणि संस्थाचालक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत,जुनी पेन्शन योजनेत असणाऱ्या त्रुटी आम्ही दूर केल्या आहेत.
रणजितसिंह देशमुख म्हणाले की,एकदिलाने मिळून सर्वांनी काम केल्याने पुणे विभाग मतदारसंघात घवघवीत यश मिळाले असून यामध्ये माण-खटावच्या मतदारांचा मोठा वाटा आहे,या दोन्ही तालुक्याच्या विकासात पृथ्वीराज बाबांचा मोठा वाटा असल्याचाही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रभाकर घार्गे,सुरेंद्र गुदगे,सुरेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी राजाभाऊ देशमुख, राजुभाई मुलाणी,भरत जाधव,परेश जाधव,विजय शिंदे,डॉ.संतोष गोडसे,टिल्लू बागवान,सत्यवान कांबळे,तानाजी बागल, डॉ पेठे,गोविंद भंडारे,सचिन घाडगे,प्रमोद राऊत,राजेंद्र जगदाळे यांचेसह तालुक्यातील शिक्षक, संस्थाचालक उपस्थित होते.