दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । फलटण । संपूर्ण देशासह जगभरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही स्वरुपाचे उत्सव व महामानवाच्या जयंत्या करता आल्या नाहीत.परंतु कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे व राज्य सरकारने सर्व निर्बंध उठवल्यामुळे मौजे सासकल तालुका फलटण येथे अत्यंत उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.या वेळी सासकल गावच्या सरपंच श्रीम.उषाताई राजेंद्र फुले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या.त्यांनी सर्व नागरिकांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी सासकल ग्रामपंचायतचे सदस्य मोहन नामदेव मुळीक,माजी सरपंच लक्ष्मण गणपत मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, माजी उपसरपंच दत्तात्रय धोंडिबा दळवी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश दत्तात्रय मुळीक,विकास लक्ष्मण मुळीक, दत्तात्रय मदने,सासकल जनआंदोलन समितीचे सचिन खुडे,ज्येष्ठ कार्यकर्ते माणिकराव घोरपडे,नितीन धनाजी घोरपडे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्धवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सासकलमधील सुरेखा मधुकर घोरपडे, निकिता दीपक घोरपडे,अधिका संजय घोरपडे, शीतल राजेंद्र घोरपडे, अश्विनी अक्षय घोरपडे, उज्ज्वला संजय घोरपडे,संगीता नंदकुमार घोरपडे,राजनंदिनी कुंदन घोरपडे, पूर्वा मधुकर घोरपडे,प्रतीक्षा राजेंद्र घोरपडे,प्रणाली राजेंद्र घोरपडे,दीक्षा राजेंद्र घोरपडे,साक्षी शैलेश घोरपडे,सौरभ शैलेश घोरपडे,शेखर उत्तम लोंढे,विशाल हणमंत घोरपडे,अक्षय सुखदेव घोरपडे,अथर्व संजय घोरपडे, मानव कुंदन घोरपडे,यश नंदकुमार घोरपडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.